एअरटेलने यूट्यूबसोबत भागीदारी करत प्रीपेड ग्राहकांसाठी प्रीमियम मनोरंजन आणले
भारती एअरटेलने यूट्यूबसोबत भागीदारी केली असून प्रीपेड ग्राहकांना मोफत यूट्यूब प्रीमियम सेवा उपलब्ध करून दिली आहे.
पुणे : भारती एअरटेलने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी यूट्यूबसोबत भागीदारी करत यूट्यूब प्रीमियम सेवा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे ग्राहकांना जाहिरातमुक्त व्हिडिओ, पार्श्वभूमीत व्हिडिओ प्लेबॅक आणि ऑफलाइन डाउनलोडची सुविधा मिळणार आहे.
या भागीदारीमुळे एअरटेलच्या ३० जीबी अतिरिक्त डेटा असणाऱ्या रिचार्ज प्लॅन्ससोबत यूट्यूब प्रीमियमचा मोफत लाभ ग्राहकांना घेता येईल. डिजिटल मनोरंजनाला चालना देण्याच्या उद्देशाने ही सेवा सुरू करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.
