आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    'मुख्यमंत्री आरोग्य संवाद : जागर महाराष्ट्र राज्य आरोग्याचा' उपक्रम पुणे जिल्ह्यात यशस्वीरीत्या संपन्न!

    पुणे जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये 'मुख्यमंत्री आरोग्य संवाद' उपक्रम पार पडला असून ११ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी आरोग्याची शपथ घेतली.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २४ ऑक्टोबर २०२६

    पुणे : विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी पुणे जिल्ह्यात १३ ते २४ ऑक्टोबर दरम्यान 'मुख्यमंत्री आरोग्य संवाद : जागर महाराष्ट्र राज्य आरोग्याचा' हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी (MUHS) संलग्न महाविद्यालयांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला.

    जिल्ह्यातील ११८ केंद्र व संस्थांमध्ये आयोजित या सत्रांमध्ये ११ हजार ६३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. निरोगी जीवनशैली, व्यसनमुक्ती, मानसिक स्वास्थ्य आणि संतुलित आहार यांसारख्या विषयांवर तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.