क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांची द्विशताब्दी जयंती वर्ष विविध उपक्रमांनी साजरे करण्याचे आवाहन
महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून पुणे जिल्ह्यात विविध सामाजिक व जनजागृती उपक्रम राबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे : एप्रिल २०२६ ते एप्रिल २०२७ या कालावधीत क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष राज्यभरात विविध उपक्रमांनी साजरे केले जात आहे. त्याअनुषंगाने पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे यांनी केले आहे.
या जयंती वर्षात महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित वक्तृत्व स्पर्धा, पथनाट्ये, चित्रपट दाखवणे व निबंध स्पर्धांचे आयोजन करून त्यांचे सामाजिक विचार घराघरांत पोहोचवले जाणार आहेत.
