अनिश्चिततेमुळे विकासदर मंदावणार
जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळे भारताचा विकासदर मंदावण्याचा अंदाज एस अँड पी ग्लोबलने व्यक्त केला आहे.
मुंबई : जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि अमेरिकेच्या आयात शुल्कातील बदलांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर मंदावण्याची शक्यता एस अँड पी ग्लोबल इंडियाने व्यक्त केली आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात ६.८ टक्के वाढ नोंदवली तरी पुढील वर्षात त्यात घसरण होऊ शकते.
तेल व वायू पुरवठा साखळीवर अवलंबून असलेल्या भारताला इंधन पुरवठ्यात अडथळे आल्यास मोठा फटका बसू शकतो, असा इशारा अहवालात देण्यात आला आहे.
