आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    रविवारी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी, उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत असाक्षर व्यक्तींची परीक्षा

    उल्लास-नवभारत साक्षरता अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यातील नवसाक्षरांसाठी रविवारी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी आयोजित करण्यात आली आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २४ ऑक्टोबर २०२६

    पुणे : केंद्र शासन पुरस्कृत 'उल्लास - नवभारत साक्षरता कार्यक्रमा'अंतर्गत पुणे जिल्ह्यातील असाक्षर व्यक्तींसाठी रविवारी, २४ ऑक्टोबर रोजी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत शाळांमध्ये होईल.

    या चाचणीत वाचन, लेखन आणि संख्याज्ञान या तीन विषयांचा समावेश असून १५० गुणांची ही उत्तरपत्रिका असेल. परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या नवसाक्षरांना शासनाचे अधिकृत प्रमाणपत्र व गुणपत्रक दिले जाईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी दिली.