पशुधनासाठी चारा उपलब्धतेसाठी राज्यभर 'मिशन मुरघास' मोहीम, चारा निर्मितीसाठी ६४.४१ कोटींचा अतिरिक्त निधी; विदर्भ-मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांत 'मागेल त्याला मुरघास' योजना
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीत पशुधनाला चारा उपलब्ध व्हावा म्हणून राज्य शासनाने ६४.४१ कोटींचा निधी मंजूर करत 'मिशन मुरघास' मोहीम सुरू केली आहे.
पुणे : राज्यातील ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला असून पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राज्यभर 'मिशन मुरघास' मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेसाठी ६४.४१ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमध्ये 'मागेल त्याला मुरघास' ही विशेष योजना सुरू करण्यात आली आहे. उन्हाळ्यातील दुष्काळी परिस्थितीत वैरणीचा तुटवडा जाणवू नये यासाठी शेतकरी व पशुपालकांना शास्त्रीय पद्धतीने मुरघास तयार करण्याचे प्रशिक्षणही दिले जात आहे.
