आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे येथे 'यशराज प्रसाद पाटील' मल्टी-ऑर्गन ट्रान्सप्लांट सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन, महाराष्ट्रातील प्रगत अवयव प्रत्यारोपण सेवांना मिळणार बळ

    पिंपरीतील डी. वाय. पाटील रुग्णालयात 'यशराज प्रसाद पाटील मल्टी-ऑर्गन ट्रान्सप्लांट सेंटर ऑफ एक्सलन्स'चे उद्घाटन करण्यात आले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २४ ऑक्टोबर २०२६

    पुणे : डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पिंपरी येथे 'यशराज प्रसाद पाटील मल्टी-ऑर्गन ट्रान्सप्लांट सेंटर ऑफ एक्सलन्स'चे उद्घाटन पार पडले. या केंद्रामुळे राज्यातील तसेच देशातील अवयव प्रत्यारोपणाची गरज असलेल्या रुग्णांना आधुनिक आणि प्रगत वैद्यकीय उपचार सुलभतेने उपलब्ध होणार आहेत.

    या केंद्रात संसर्ग नियंत्रणासाठी विशेष एअर-हँडलिंग यंत्रणा उभारण्यात आली आहे. यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुस, हृदय आणि संयुक्त अवयव प्रत्यारोपणासाठी अनुभवी तज्ज्ञांची टीम उपलब्ध असून यामुळे महाराष्ट्रातील अवयव प्रत्यारोपण मोहिमेला मोठे बळ मिळणार आहे.