एचडीएफसी बँके तर्फे सायबर सुरक्षा जागरूकता मोहिमे अंतर्गत केले १.८ लाख नागरिकांना शिक्षित
एचडीएफसी बँकेने 'सायबर फ्रॉड सुरक्षा' उपक्रमांतर्गत १.८ लाखांहून अधिक नागरिकांना सायबर सुरक्षेबाबत शिक्षित केले.

पुणे : ग्राहकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी एचडीएफसी बँकेच्या वतीने देशभरात व्यापक मोहीम राबवण्यात आली. जुलै ते ऑक्टोबर २०२६ दरम्यान ८,८०० हून अधिक कार्यशाळांचे आयोजन करून १.८ लाखांहून अधिक नागरिकांना डिजिटल सुरक्षेचे धडे देण्यात आले.
या कार्यशाळांच्या माध्यमातून शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, नागरिक आणि कर्मचाऱ्यांना सायबर गुन्ह्यांचे प्रकार व त्यापासून ऑनलाइन बँकिंग सुरक्षित ठेवण्याच्या पद्धतींची माहिती देण्यात आली.
