आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर फेरीवाला प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात!

    पिंपरी-चिंचवड महापालिकेने तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पात्र फेरीवाल्यांना ओळखपत्र व प्रमाणपत्र वाटप सुरू केले आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २४ ऑक्टोबर २०२६

    पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने २०२२ मध्ये केलेल्या फेरीवाला सर्वेक्षणात नोंदणी झालेल्या पथविक्रेत्यांना चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर ओळखपत्र आणि प्रमाणपत्र वाटप करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

    महापालिका प्रशासनाने अ ते ल या आठही प्रभाग कार्यालयांतर्गत नोंदणीकृत फेरीवाल्यांना १,४०० रुपये शुल्क भरून प्रमाणपत्र देण्याचे काम हाती घेतले आहे. यामुळे शहरातील हजारो फेरीवाल्यांना अधिकृत व्यवसाय करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.