पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या मतदानानंतर भाजप नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घेतला विसावा!
पुणे पदवीधर-शिक्षक मतदानाची धावपळ संपल्यानंतर भाजपचे नेते व कार्यकर्ते चिंचवडमध्ये एकत्र येत अनौपचारिक गप्पांमध्ये रमले.

पिंपरी : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रचार संपल्यानंतर २३ ऑक्टोबर रोजी शांततेत मतदान पार पडले. गेल्या १२-१३ दिवसांपासून अथक परिश्रम घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी मतदानानंतर सुटकेचा निःश्वास सोडला.
चिंचवड येथील फत्तेचंद जैन हायस्कूलजवळील बूथवर भाजपचे कामगार नेते यशवंतभाऊ भोसले, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत अनौपचारिक गप्पा मारत विसावा घेतला.
