पाणी बचतीसाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी दक्षता घ्यावी, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे विभागांना निर्देश
पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शहरातील पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी सर्व विभागांना दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना, भामा आसखेड आणि आंद्रा धरणांतील उपलब्ध पाणी साठ्याचा विचार करून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी सर्व विभागांना सतर्कतेचे निर्देश दिले आहेत.
शाळा, उद्याने, सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि महापालिकेच्या इमारतींमधील नळ व पाणीपुरवठा उपकरणांची तपासणी करून गळती तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा परिपत्रकाद्वारे दिला आहे.
