पथनाट्यातून स्वच्छतेचा जागर, ताथवडेतील विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छतेचा संदेश
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे ताथवडे शाळा परिसरात विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून कचरा वर्गीकरण व स्वच्छतेचा संदेश दिला.

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या वतीने ताथवडे येथील जिल्हा परिषद शाळेत पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी ओला व सुका कचरा वेगळा करणे, रस्त्यावर कचरा न टाकणे आणि प्लास्टिकचा वापर टाळणे याविषयी संदेश दिला.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. नागरिकांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून शहर स्वच्छ ठेवण्यास मदत करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
