आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    'सेवा संकल्प अभियानांतर्गत' बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध जनजागृतीपर उपक्रम

    बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत दिव्यांगांना दाखले वाटप व आरोग्यविषयक उपक्रम पार पडले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २४ ऑक्टोबर २०२६

    बारामती : बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात 'सेवा संकल्प अभियाना'अंतर्गत विविध आरोग्यविषयक उपक्रम आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम पार पडले.

    या अभियानांतर्गत १४ दिव्यांग व्यक्तींना वैद्यकीय दाखले देण्यात आले. तसेच अवयवदान, महिलांचे आरोग्य आणि रक्तदानाबाबत जनजागृती करण्यासाठी रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व आणि पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.