हुंदाई बेयाँसह सेफ्टी ऑन:
हुंदाई मोटर इंडियाने नव्या 'हुंदाई बेयाँ' गाडीतील प्रगत सुरक्षा तंत्रज्ञानाची घोषणा केली आहे.

पुणे : हुंदाई मोटर इंडियाने आपल्या 'हुंदाई बेयाँ' या नव्या मॉडेलमध्ये आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाचा समावेश केला आहे. कंपनीने बेयाँच्या ६-स्टार सुरक्षा मानकांनुसार इंजिनिअर केलेल्या रचनेची माहिती दिली.
यात ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम (ADAS) आणि पॅसिव्ह व ॲक्टिव्ह सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. यामुळे भारतीय रस्त्यांवर वाहनचालक व प्रवाशांना अधिक सुरक्षित प्रवास अनुभवता येईल, असा विश्वास हुंदाईने व्यक्त केला.
