"दहावे युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरर्स फेअर २०२६": १५० हून अधिक ब्रँड्स, २५,००० हून अधिक युनिफॉर्म डिझाईन्स आणि ३,००० हून अधिक टॉवेल, चादर व नॅपकिनचे प्रकार एकाच छताखाली
सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे चेन्नई येथे ९ ते ११ डिसेंबर दरम्यान युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरर्स फेअर आयोजित केले आहे.
पुणे : सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे (SGMA) ९ ते ११ डिसेंबर २०२६ दरम्यान चेन्नई येथील ट्रेड सेंटरमध्ये 'दहावे युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरर्स फेअर २०२६' आयोजित केले आहे. या प्रदर्शनात देशभरातील १५० हून अधिक ब्रँड्स सहभागी होणार आहेत.
प्रदर्शनात शाळा, कॉलेज, हॉस्पिटल आणि कॉर्पोरेट क्षेत्रासाठीचे २५,००० हून अधिक युनिफॉर्म डिझाईन्स तसेच ३,००० पेक्षा जास्त सोलापुरी चादरी व टॉवेल्सचे प्रकार पाहायला मिळतील. बी-टू-बी तत्त्वावरील या प्रदर्शनामुळे सोलापूरच्या वस्त्रोद्योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर वाव मिळणार आहे.
