आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    पुणे जिल्ह्यात २३२ मतदान केंद्रांवर आज मतदान; १ लाख ५ हजार ८४ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

    पुणे जिल्ह्यातील २३२ मतदान केंद्रांवर १ लाख ५ हजार ८४ मतदार विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावत आहेत.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २४ ऑक्टोबर २०२६

    पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून २३२ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पुणे जिल्ह्यात एकूण १ लाख ५ हजार ८४ नोंदणीकृत मतदार आहेत.

    पदवीधर मतदारसंघासाठी ८८ हजार २०२ तर शिक्षक मतदारसंघासाठी १६ हजार ८८२ मतदार आहेत. मतदानासाठी निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात आले असून २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.