आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना सरकारचा मोठा दिलासा! दहावी : बारावी परीक्षार्थींचे शुल्क पूर्णतः माफ

    राज्यातील ३०५ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी पूर्णपणे माफ करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २६ ऑक्टोबर २०२६

    मुंबई : राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ३०५ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क पूर्णतः माफ करण्यात आले आहे. अनुदानित आणि खाजगी शाळांमधील सर्व परीक्षार्थींना या निर्णयाचा थेट फायदा मिळणार आहे.

    याशिवाय, जे पालक शहरात राहत आहेत परंतु त्यांची शेती दुष्काळग्रस्त तालुक्यात आहे, त्यांच्या पाल्यांनादेखील या फी माफीचा लाभ मिळणार आहे. या निर्णयाची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग अतिरिक्त खर्च करत असल्यास त्याची दखल घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.