आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    तुकाराम मुंढेंच्या FDA कडून कारवाईचा धडाका; बुलढाण्यात मसाल्यांच्या साठ्यावर मोठी कारवाई; १ कोटीचा माल जप्त

    अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीएने बुलढाणा व बीड जिल्ह्यात कारवाई करत १ कोटी रुपयांचा अनधिकृत मसाला साठा जप्त केला.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २६ ऑक्टोबर २०२६

    बीड : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षेबाबत मोठी कारवाई करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपळनेर येथील मे. अनोखे फूड्स अँड स्पाइसेस व जनता सेवा मिरची मसाला या आस्थापनांवर धाड टाकून १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा भेसळयुक्त मसाला साठा जप्त करण्यात आला.

    या कारवाईत स्वच्छता, कीटक नियंत्रण व गुणवत्ता मानकांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्याने दोन्ही आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. याशिवाय धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील प्रसिद्ध हॉटेल्स व खाद्यपदार्थ उत्पादकांवरही एफडीएने दणका दिला आहे.