नैना क्षेत्रात १५ लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट; विकासाच्या संधींमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नवी मुंबई नैना क्षेत्रातील विकासप्रकल्पांचे लोकार्पण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवत भूमिपुत्रांना प्राधान्य देण्याची घोषणा केली.

रायगड-अलिबाग : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) परिसराच्या नियोजनबद्ध विकासातून सुमारे १५ लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या विकासातून निर्माण होणाऱ्या संधींमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
पनवेल तालुक्यातील शिरढोण येथे नैना परिसरातील विविध जोड प्रकल्पांच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. नैना परिसर हा महाराष्ट्राचा नवा ग्रोथ इंजिन ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
