कर्मचारीकेंद्रित कार्यसंस्कृतीसाठी एलजीला तिसऱ्यांदा प्रमाणपत्र
एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाला उत्कृष्ट कर्मचारी केंद्रित कार्यसंस्कृतीसाठी सलग तिसऱ्या वर्षी 'ग्रेट प्लेस टू वर्क' प्रमाणपत्र मिळाले आहे.
नवी दिल्ली : एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया लिमिटेडला 'ग्रेट प्लेस टू वर्क' (Great Place to Work) प्रमाणपत्र सलग तिसऱ्या वर्षी प्राप्त झाले आहे. कर्मचाऱ्यांचा विश्वास, सहभाग आणि सकारात्मक कार्यसंस्कृती विकसित करण्याच्या प्रयत्नांना या मान्यतेतून अधोरेखित करण्यात आले आहे.
कार्यस्थळावरील संस्कृती आणि कर्मचारी मूल्यांकनाच्या आधारे ट्रस्ट इंडेक्स सर्वेक्षणाद्वारे हे प्रमाणपत्र दिले जाते. कर्मचाऱ्यांच्या कल्याणाला केंद्रस्थानी ठेवून उत्तम वातावरण निर्माण करण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांना यश आल्याचे व्यवस्थापकीय संचालक हाँग जू जिऑन यांनी सांगितले.
