आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    ५०० च्या नोटा देऊन गेला, महिलांना तैयार केलं अन् पोलिसांनी मिस कॉल दिला; पुण्यातील रिसॉर्टचा कसा झाला भंडाफोड?

    भोर तालुक्यातील वेळू येथील आमराई रिसॉर्टवर राजगड पोलिसांनी छापा टाकून देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला असून १३ महिलांची सुटका केली.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २६ ऑक्टोबर २०२६

    पुणे : भोर तालुक्यातील वेळू येथील आमराई रिसॉर्टवर पोलिसांनी बोगस ग्राहक पाठवून देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. राजगड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने केलेल्या कारवाईत १३ पीडित महिलांची सुटका करण्यात आली.

    पोलिसांनी बोगस ग्राहकाकरवी ५०० रुपयांच्या चिन्हांकित नोटा देऊन रिसॉर्ट चालकाला जाळ्यात पकडले आणि फोनवरून मिस कॉल मिळताच छापा टाकला. रिसॉर्ट चालक वैभव इंगळे व इतर साथीदारांवर राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.