१०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आळंदीत नांदी संमेलन : साहित्यनिष्ठांची मांदियाळी २९ रोजी
१०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची नांदी म्हणून २९ ऑक्टोबर रोजी आळंदी येथे भव्य 'नांदी संमेलन' आयोजित करण्यात आले आहे.

पुणे : १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची नांदी म्हणून गुरुवार, २९ ऑक्टोबर रोजी आळंदी येथील श्री क्षेत्र अमृतानुभव येथे 'नांदी संमेलन' आयोजित करण्यात आले आहे. मायर्स एमआयटी शिक्षण संस्था, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि भाषा विभागाच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन होत आहे.
ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. संमेलनाचे अध्यक्षस्थान डॉ. श्रीपाल सबनीस भूषवणार असून, डॉ. राहुल कराड, स्वाती चाटे आणि अनेक साहित्यिक, वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
