तीन गावांतील मंदिर सभामंडपांसाठी ३० लाखांचा निधी मंजूर
खेड तालुक्यातील कुरकुंडी, कोये आणि पिंपरी बुद्रुक येथील मंदिर सभामंडपांच्या कामासाठी शरद बुट्टे-पाटील यांच्या प्रयत्नातून ३० लाखांचा निधी मंजूर झाला.
पुणे : खेड तालुक्यातील कुरकुंडी, कोये आणि पिंपरी बुद्रुक या तीन गावांतील मंदिर सभामंडपांच्या विकासकामांसाठी एकूण ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शरद बुट्टे-पाटील यांच्या प्रयत्नातून हा निधी उपलब्ध झाला.
प्रत्येक मंदिराच्या सभामंडपासाठी १० लाख रुपयांचा निधी देण्यात आला असून, प्रशासकीय मान्यतेचे पत्र नुकतेच प्रदान करण्यात आले. या विकासकामांमुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
