भीमाशंकर अभयारण्यातील झाडांची खरंच कत्तल होतेय? मुख्यमंत्र्यांनंतर वन विभागाचा वेगळाच दावा
भीमाशंकर अभयारण्यात जलविद्युत प्रकल्पासाठी बेकायदेशीर वृक्षतोड होत असल्याचा आरोप वन विभागाने फेटाळून लावला असून प्रकल्प सीमेबाहेर असल्याचे स्पष्ट केले.

पुणे : भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यात टॉरंट पॉवर कंपनीच्या प्रस्तावित पंप स्टोरेज प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल होत असल्याचा आरोप राजकीय नेत्यांनी केला होता. मात्र, वन विभागाने यावर खुलासा करत अभयारण्याच्या हद्दीत कोणतीही अवैध वृक्षतोड झाली नसल्याचा दावा केला आहे.
प्रस्तावित प्रकल्प अभयारण्याच्या सीमेबाहेर असून तो इको-सेंसिटिव्ह झोनच्या बाहेर आहे. पर्यावरण रक्षणाचे सर्व नियम पाळले जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते आदित्य ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मुद्द्यावर कर्जत दौरा करणार आहेत.
