भीमाशंकर अभयारण्यातील झाडांची खरंच कत्तल होतेय? मुख्यमंत्र्यांनंतर वन विभागाचा वेगळाच दावा, काय म्हटलंय?
भीमाशंकर अभयारण्यातील जलविद्युत प्रकल्पाबाबतच्या वादावर वन विभागाने अधिकृत परिपत्रक जारी करत सर्व नियम पाळले जात असल्याचे सांगितले.
पुणे : भीमाशंकर अभयारण्यातील प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावर वन विभागाने अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध करून अभयारण्याच्या हद्दीत कोणतीही बेकायदेशीर वृक्षतोड झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
कंपनीला २४३ हेक्टर खाजगी जमीन देण्यात आली असून २५० हजार झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा प्रकल्प अभयारण्याच्या बाहेरील भागात असून पर्यावरणाचे सर्व नियम पाळले जात असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.
