महिलाच जपतात आपले सण, आपली संस्कृती आणि परंपरा : संदीप खर्डेकर
कोथरूड येथे क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि के. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठानतर्फे आयोजित होम मिनिस्टर स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

पुणे : महिला आपल्या कुटुंबासोबतच सण, परंपरा आणि संस्कृती जपण्याचे मोलाचे कार्य करत असतात, असे प्रतिपादन संदीप खर्डेकर यांनी केले. कोथरूड येथे क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि के. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित 'होम मिनिस्टर' स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते.
या स्पर्धेत अनेक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विजेत्या महिलांना फ्रीज, गॅस शेगडी, टेबल फॅन अशी आकर्षक बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाला नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, श्वेताली भेलके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
