अवकाश तंत्रज्ञान स्पर्धेत सहा विद्यार्थी अंतिम फेरीत
व्हायासॅट इंडिया आयोजित 'स्पेस फॉर गुड इंडिया चॅलेंज २०२६' या अवकाश तंत्रज्ञान स्पर्धेत सहा विद्यार्थी संघांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.
नवी दिल्ली : व्हायासॅट इंडिया या उपग्रह संपर्क क्षेत्रातील जागतिक कंपनीने 'व्हायासॅट : स्पेस फॉर गुड इंडिया चॅलेंज २०२६' या स्पर्धेतील अंतिम सहा विद्यार्थी संघांची घोषणा केली आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी २७ ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे.
या स्पर्धेत एकूण ११ लाख ५० हजार रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. प्रथम क्रमांकास ५ लाख रुपये, द्वितीय ३ लाख आणि तृतीय क्रमांकास २ लाख रुपये प्रदान केले जातील. विद्यार्थ्यांना अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
