बालिकेच्या मृत्यूनंतर आरोग्य विभाग खडबडून जागा; डासांची उत्पत्तीस्थळे शोधणे, औषध फवारणी, उपाययोजनांना सुरुवात
पुण्यात ८ वर्षांच्या बालिकेचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्यानंतर पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरात व्यापक फवारणी आणि डासोत्पत्ती शोध मोहीम सुरू केली आहे.

पुणे : पुण्यात ८ वर्षांच्या बालिकेचा डेंग्यूच्या तीव्र संसर्गामुळे मृत्यू झाल्यानंतर पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. महापालिकेच्या आरोग्य पथकांनी शहरातील विविध भागांत डासांची उत्पत्तीस्थळे शोधणे, कीटकनाशक औषध फवारणी करणे आणि धूर फवारणी मोहीम तीव्र केली आहे.
आरोग्य प्रमुख डॉ. निना बोराडे यांनी नागरिकांना आपापला परिसर स्वच्छ ठेवण्याचे आणि साचलेले पाणी काढून टाकण्याचे आवाहन केले आहे. ताप आल्यास अंगावर न काढता तातडीने महापालिकेच्या दवाखान्यात मोफत तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला आहे.
