आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीर; फायनान्स कंपन्यांच्या मनमानीवर कडक कारवाई करणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

    नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देणाऱ्या फायनान्स कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २६ ऑक्टोबर २०२६

    पुणे : नैसर्गिक संकटांमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना कर्जवसुलीच्या नावाखाली त्रास देणाऱ्या आणि मनमानी कारभार करणाऱ्या फायनान्स कंपन्यांवर सरकार कडक कारवाई करेल, असा स्पष्ट इशारा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला. इंदापूर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर असल्याचे सांगितले.

    शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या किंवा त्यांना मानसिक त्रास देणाऱ्या कंपन्यांचे परवाने रद्द केले जातील. जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनाला अशा कंपन्यांविरुद्ध कठोर कायदेशीर पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे कृषिमंत्र्यांनी नमूद केले.