आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    संविधान प्रस्ताविका पाडल्याप्रकरणी काँग्रेसच्या बेमुदत आंदोलनाचा तिसरा दिवस; आंदोलन स्थळी माथेफिरूंचा वावर

    सांगवी येथील संविधान चौकातील प्रस्ताविका शिल्पाची तोडफोड केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे बेमुदत ठिय्या आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू राहिले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २६ ऑक्टोबर २०२६

    चिंचवड/सांगवी : सांगवी येथील संविधान चौकातील भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेच्या शिल्पाची तोडफोड केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे बेमुदत ठिय्या आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच राहिले. शिल्पाची पूर्ववत उभारणी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

    दरम्यान, आंदोलन स्थळी काही संशयित आणि माथेफिरू व्यक्तींचा वावर वाढल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून, लवकरात लवकर तोडफोड करणाऱ्यांना अटक न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.