पिंपळे सौदागर येथे राष्ट्र सेविका समितीचे सघोष पथसंचलन आणि शस्त्रपूजन उत्साहात संपन्न
राष्ट्र सेविका समिती पुणे जिल्ह्याच्या वतीने पिंपळे सौदागर येथे ३५० सेविकांच्या सहभागात सघोष पथसंचलन आणि शस्त्रपूजन पार पडले.

पिंपरी : राष्ट्र सेविका समिती पुणे जिल्ह्याच्या वतीने पिंपळे सौदागर येथे सघोष पथसंचलन आणि शस्त्रपूजन कार्यक्रम उत्साहात पार पडला. संपूर्ण पुणे जिल्ह्यातून सुमारे ३५० सेविकांनी या संचलनात सहभाग घेतला.
कार्यक्रमादरम्यान सेविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने संचलन केले. शंखवादन आणि पारंपरिक पथसंचलनामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रसंगी विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
