आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणीत सुमारे सात लाख परीक्षार्थी सहभागी

    केंद्र पुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत राज्यभरात घेतलेल्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान चाचणीत सुमारे सात लाख परीक्षार्थी सहभागी झाले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २६ ऑक्टोबर २०२६

    मुंबई : केंद्र पुरस्कृत 'उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमा'अंतर्गत राज्यभरात घेण्यात आलेल्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणीत (FLNAT) सुमारे सात लाख परीक्षार्थींनी सहभाग घेतला. या चाचणीत उत्तीर्ण होणाऱ्या परीक्षार्थींना पुढील शिक्षणासाठी इयत्ता ३ री, ५ वी, ८ वी किंवा १० वीच्या परीक्षांना बसता येणार आहे.

    शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, प्रधान सचिव रणजित सिंह देओल आणि शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा सुरळीत पार पडली. निरक्षर व्यक्तींना साक्षर करण्यासाठी राज्यभरातील विविध शाळांमध्ये ही मोहीम राबवली जात आहे.