आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    शबरी नॅचरल्सच्या पॅकेजिंगमधून आदिवासी संस्कृतीचे दर्शन; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून गौरव

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमात शबरी नॅचरल्सच्या आदिवासी कलाकुसरयुक्त पॅकेजिंगचे विशेष कौतुक केले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २६ ऑक्टोबर २०२६

    मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'मन की बात' कार्यक्रमाच्या १३९ व्या भागात शबरी नॅचरल्सच्या आदिवासी कलाकुसरयुक्त उत्पादनांच्या पॅकेजिंगचे विशेष कौतुक केले आहे. शबरी नॅचरल्सच्या उत्पादनांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर 'गुड डिझाईन अवॉर्ड' मिळवला आहे.

    महाराष्ट्राच्या आदिवासी विकास महामंडळामार्फत विकसित करण्यात आलेल्या या ब्रँडमुळे आदिवासी कलाकारांना आणि महिला बचत गटांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळण्यास मदत झाली आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.