'इंडिया ज्वेलरी पार्क'मुळे महाराष्ट्र जागतिक दागिने उत्पादन व निर्यातीचे केंद्र बनेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नवी मुंबईतील महापे येथे २५ हजार कोटींच्या गुंतवणुकीतून उभारण्यात येणाऱ्या 'इंडिया ज्वेलरी पार्क'चे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

ठाणे : नवी मुंबईतील महापे येथे २२ एकर जागेवर उभारल्या जाणाऱ्या 'इंडिया ज्वेलरी पार्क'चे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राला जागतिक स्तरावर दागिने उत्पादन आणि निर्यातीचे मुख्य केंद्र बनवण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
या प्रकल्पात सुमारे २५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपात १ लाख रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री गणेश नाईक, जीजेईपीसीचे अध्यक्ष किरीट भन्साळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
