आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    आठ मतपेट्यांना सीलच नाही; पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ

    बालेवाडी येथील पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर आठ मतपेट्यांना सील नसल्याचा आक्षेप घेण्यात आल्याने काही काळ तीव्र गोंधळ उडाला.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २७ ऑक्टोबर २०२६

    पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर काही काळ गोंधळ निर्माण झाला. पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात मतमोजणी प्रक्रिया सुरू असताना आठ मतपेट्यांना अधिकृत सील नसल्याचा दावा करत महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षा देशमुख यांनी आक्षेप घेतला.

    या गोंधळामुळे काही काळासाठी मतमोजणी प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेत निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारला. पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.