आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    'हर घर संत रविदास विचार-विकसित महाराष्ट्र' विशेष अभियान राज्यात व्यापक स्वरूपात राबवा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    संत रविदास महाराजांच्या ६५० व्या जयंतीनिमित्त राज्यात 'हर घर संत रविदास विचार-विकसित महाराष्ट्र' हे विशेष अभियान व्यापक स्वरूपात राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २७ ऑक्टोबर २०२६

    मुंबई : संत रविदास महाराजांच्या ६५० व्या जयंती निमित्त नोव्हेंबर २०२६ ते फेब्रुवारी २०२७ या कालावधीत राबविण्यात येणारे 'हर घर संत रविदास विचार-विकसित महाराष्ट्र' हे विशेष अभियान राज्यात व्यापक स्वरूपात राबवावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

    यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, बार्टीच्या महासंचालिका डॉ. दीपा मुधोळ-मुंडे उपस्थित होते. अभियानाच्या नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंतचा आढावा घेण्यासाठी समिती गठीत केली जाणार आहे.