आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    देश-विदेश

    दक्षता जनजागृती सप्ताह निमित्ताने महाराष्ट्र सदनात शपथ

    नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे भ्रष्टाचार निर्मूलन व पारदर्शकतेचा संदेश देत दक्षता जनजागृती सप्ताहनिमित्त सत्यनिष्ठेची शपथ घेण्यात आली.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २७ ऑक्टोबर २०२६

    नवी दिल्ली : भ्रष्टाचार निर्मूलन, पारदर्शकता आणि प्रशासकीय कामकाज सचोटी रुजविण्याच्या उद्देशाने नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे दक्षता जनजागृती सप्ताहनिमित्त सत्यनिष्ठेची शपथ घेण्यात आली. निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना शपथ दिली.

    २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत हा सप्ताह साजरा केला जात आहे. सार्वजनिक प्रशासनात प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवणे तसेच भ्रष्टाचाराविरोधात जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.