आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्त्यावर जड वाहनांना बंदी; दिवाळी खरेदीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांचे आदेश

    दिवाळी खरेदीच्या गर्दीमुळे मध्य पुण्यातील शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्त्यावर जड वाहनांना प्रवेशबंदी घालण्याचे आदेश वाहतूक पोलिसांनी दिले आहेत.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २७ ऑक्टोबर २०२६

    पुणे : दिवाळीच्या खरेदीसाठी मध्य पुण्यात नागरिकांची प्रचंड गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रस्ता व बाजीराव रस्त्यावर शनिवार आणि रविवारी जड वाहनांना देण्यात आलेली प्रवेश परवानगी तात्पुरती रद्द करण्यात आली आहे. दिवाळी संपेपर्यंत ही जड वाहन बंदी लागू राहील.

    वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी हे आदेश दिले आहेत. लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, तुळशीबाग व महात्मा फुले मंडई परिसरात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.