पीएनजी ज्वेलर्स तर्फे सप्तम कलेक्शनसह दिवाळीचा उत्सव; सर्व स्टोअर्समध्ये आकर्षक फेस्टिव्ह ऑफर्स
पीएनजी ज्वेलर्सने दिवाळीनिमित्त 'सप्तम कलेक्शन' बाजारात आणले असून दागिन्यांच्या घडणावळीवर भरघोस सवलती जाहीर केल्या आहेत.

पुणे : प्रसिद्ध सुवर्णपेढी पीएनजी ज्वेलर्सने दिवाळी सणानिमित्त ग्राहकांसाठी विशेष ऑफर जाहीर केल्या आहेत. या अंतर्गत त्यांच्या नवीन 'सप्तम कलेक्शन'सह सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर ५० टक्क्यांपर्यंत तर हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर १०० टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे.
ही फेस्टिव्ह ऑफर १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत सर्व पीएनजी दालनांमध्ये उपलब्ध असेल, अशी माहिती कंपनीने दिली आहे.
