दुबईत आऊटडोअर पर्यटनासाठी हिवाळी हंगाम अनुकूल
दुबईत हवामान आल्हाददायक झाल्याने पर्यटकांना आऊटडोअर उपक्रम आणि क्रीडा स्पर्धांचा आनंद घेता येत आहे.

नवी दिल्ली : तापमानात घट झाल्यामुळे दुबईमध्ये आऊटडोअर पर्यटनाचा हिवाळी हंगाम सुरू झाला आहे. समुद्रकिनारे, उद्याने आणि डोंगराळ भागात सायकलिंग, जलक्रीडा आणि ट्रेकिंगसाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.
३१ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दहावी 'दुबई फिटनेस चॅलेंज' स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामुळे स्थानिक व आंतरराष्ट्रीय पर्यटकांना उत्तम आऊटडोअर अनुभव मिळत आहे.
