इसुझू मोटर्स इंडियाच्या वतीने श्री सिटी प्लांटमध्ये सर्वोत्तम निर्मितीची १० वर्षे साजरी
इसुझू मोटर्स इंडियाच्या आंध्र प्रदेशातील श्री सिटी वाहन उत्पादन केंद्राने यशस्वी १० वर्षे पूर्ण केली आहेत.

पुणे : इसुझू मोटर्स इंडियाने आंध्र प्रदेशातील श्री सिटी येथील आपल्या आधुनिक उत्पादन प्रकल्पाच्या यशस्वी निर्मितीची १० वर्षे पूर्ण केली आहेत. एप्रिल २०१६ मध्ये या प्लांटची सुरुवात झाली होती.
या १० वर्षांत इसुझूने देशांतर्गत तसेच जागतिक बाजारासाठी दर्जेदार व्यावसायिक व वैयक्तिक वाहनांची निर्मिती केली आहे, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र सन्ना रेड्डी यांनी दिली.
