आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    पुणे विभाग पदवीधर व पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

    पुणे विभाग पदवीधर व शिक्षक आमदारकीच्या मतमोजणीसाठी बालेवाडी क्रीडा संकुलात १०० हून अधिक टेबल सज्ज करण्यात आले असून कडक बंदोबस्त तैनात केला आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २७ ऑक्टोबर २०२६

    पुणे : विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांची मतमोजणी बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात होत आहे. मतमोजणी प्रक्रिया अत्यंत अचूक, शांततेत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

    पदवीधर मतदारसंघासाठी १०० टेबल्स आणि शिक्षक मतदारसंघासाठी ४२ टेबल्सची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक आणि दोन सहाय्यक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिली.