जिल्ह्यात रब्बी ज्वारी लागवडीला कृषी विभागाचे प्रोत्साहन
पुणे जिल्ह्यात रब्बी ज्वारीचे क्षेत्र वाढवण्यासाठी कृषी विभागाने १५ हजार ६६० मोफत बियाणे मिनीकिट वितरीत करण्याची मोहीम आखली आहे.
पुणे : रब्बी हंगामात ज्वारीचे उत्पादन आणि क्षेत्र वाढवण्यासाठी कृषी विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यासाठी १५ हजार ६६० बियाणे मिनीकिट (६३४ क्विंटल बियाणे) मंजूर करण्यात आले आहे.
कमी पावसात उत्तम उत्पादन देणाऱ्या ज्वारी पिकासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलद्वारे अर्ज करून मिनीकिटचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.
