नैसर्गिक आपत्तीला फक्त शेतकऱ्यांनी सामोरे जायचे का ? - रविकांत तुपकर
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती आणि चारा छावण्या सुरू करण्याची मागणी केली आहे.
पुणे : राज्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती असताना शेतकरी व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा वेळी नैसर्गिक आपत्तीला केवळ शेतकऱ्यांनीच सामोरे जायचे का, असा सवाल क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केला.
दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तातडीने पिकांची भरपाई देणे, जनावरांसाठी छावण्या उभारणे व कर्जमाफी योजना प्रभावीपणे राबवण्याची मागणी तुपकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
