जेव्हा लग्नाची स्वप्ने आर्थिक अडथळ्यांपुढे उभी ठाकतात, तेव्हा पुण्यधाम ट्रस्ट गरजू कुटुंबांना आशेचा किरण दाखवतो
पुण्यधाम ट्रस्टतर्फे १२ डिसेंबर रोजी पुण्यात गरजू कुटुंबांसाठी मोफत सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे : आर्थिक अडचणींमुळे ज्या कुटुंबांना मुला-मुलींचा विवाह करणे शक्य होत नाही, अशा गरजू कुटुंबांसाठी पुण्यधाम ट्रस्टतर्फे १२ डिसेंबर २०२६ रोजी कोंढवा, पुणे येथे मोफत सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यात नवविवाहित जोडप्यांना संसारोपयोगी घरगुती सामान, पोशाख व भोजनाची मोफत सोय केली जाते. गरजू कुटुंबांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वस्त माँ कृष्णा कश्यप यांनी केले आहे.
