पुण्यात बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; ४ जणांना अटक
पुण्याच्या विश्रामबाग पोलिसांनी ५०० रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून चौघांना अटक केली व ५.६४ लाखांचे बनावट चलन जप्त केले.
पुणे : भारतीय चलनासारख्या हुबेहूब दिसणाऱ्या ५००० रुपयांच्या बनावट नोटा तयार करून चलनात आणणाऱ्या टोळीचा विश्रामबाग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी सापळा रचून चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून ५ लाख ६४ हजार रुपयांच्या १,१२८ बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
अटक आरोपींमध्ये विशाल गलांडे, गुरुनाथ मोहिते, सलमान राजे व शाफाज अन्सारी यांचा समावेश आहे. आरोपींकडून प्रिंटर, संगणक, कागद व नोटा छापण्याचे साहित्य जप्त करण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
