आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    भाजपने संविधान शिल्प हटवलेल्या चौकाला 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक' नाव द्या, परिसर 'संविधान सृष्टी' म्हणून विकसित करा : शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे

    सांगवी येथील संविधान चौकातील शिल्प हटवल्याच्या विरोधात काँग्रेसने आंदोलन तीव्र केले असून चौकाला डॉ. आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी केली आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २७ ऑक्टोबर २०२६

    चिंचवड : सांगवी येथील संविधान चौकातील संविधानाचे शिल्प भाजप महापालिकेने हटवल्याचा आरोप करत काँग्रेस पक्षाने सुरू केलेल्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस होता. या चौकाला 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक' नाव देऊन परिसर 'संविधान सृष्टी' म्हणून विकसित करावा, अशी मागणी शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी केली.

    संविधानाचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी चौकात निदर्शने केली व प्रशासनाने तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.