आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    वाकडमध्ये अननसाने भरलेला ट्रक उलटला; अननस उचलण्यासाठी नागरिकांची गर्दी

    वाकडमध्ये अननस वाहून नेणारा ट्रक उलटल्यानंतर अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी अननस गोळा करण्यासाठी नागरिकांची गर्दी जमली.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २७ ऑक्टोबर २०२६

    पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील वाकड येथील जिंजर हॉटेलसमोर अननस घेऊन जाणारा मालवाहू ट्रक अचानक उलटल्याची घटना घडली. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले व हजारो अननस रस्त्यावर पसरले.

    मात्र अपघातानंतर चालकाला मदत करण्याऐवजी रस्त्यावर विखुरलेले अननस गोळा करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.