पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महर्षि वाल्मिकी जयंतीनिमित्त अभिवादन
पिंपरी-चिंचवड महापालिकेत महर्षि वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने थोर महर्षि वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त पालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त क्रांती बावर व विक्रांत वाघचौडे यावेळी उपस्थित होते.
तसेच यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) उपमहापौर शर्मिला बाबर आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
