मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर १ नोव्हेंबरपासून नवे वाहतूक नियम
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकवर १ नोव्हेंबरपासून हलक्या वाहनांसाठी ताशी १०० किमी वेगमर्यादा लागू होणार असून मालवाहू वाहनांना प्रवेशबंदी असेल.
पिंपरी : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बहुचर्चित मिसिंग लिंक प्रकल्पावर १ नोव्हेंबर २०२६ पासून नवीन वाहतूक नियम लागू करण्यात येत आहेत. खाजगी हलक्या वाहनांसाठी ताशी १०० किमी तर बससाठी ताशी ८० किमी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
सुरक्षिततेच्या कारणास्तव पिकअप व्हॅन, टाटा एस, ट्रक यांसारख्या सर्व मालवाहू वाहनांना मिसिंग लिंकवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून त्यांना जुन्या मार्गिकेचा वापर करावा लागेल.
